रॉ किंवा रेग्युलर – कोणते मध आरोग्यासाठी चांगले?


आपल्या आहारामध्ये साखरेपेक्षा मधाचा समावेश आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगला आहे. आधी काही ठराविक कारणांसाठी मध खाल्ला जायचा. पण मधाचे फायदे जसजसे समजले जाऊ लागले, तसतसे मधाचे सेवन नियमित आहारामध्ये केले जाऊ लागले. पण आता नवीन प्रश्न उभा राहिला तो असा, की मध ‘रॉ’ वापरावा, की नेहमीचा, बाजारामध्ये मिळणारा एखाद्या ब्रँडचा वापरावा. या दोन्ही मधांमध्ये काय फरक आहे, आणि कोणता मध आरोग्यासाठी जास्त चांगला आहे, जाणून घेऊ या.

मधमाशीच्या पोळ्यातून काढलेला मध हा ‘ रॉ ‘ म्हणून ओळखला जातो. हा मध पोळ्यातून काढल्यानंतर केवळ एका नायलॉनचा कपड्यातून गाळून घेऊन बाटलीमध्ये भरून विकला जातो. या मधावर कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग केले जात नाही. त्यामुळे हा मध सर्वात शुद्ध समजला जातो. बाजारामध्ये मिळणारा ‘रेग्युलर’ मध हा निरनिराळ्या प्रकारे प्रोसेसिंग करून तयार केला जातो. हा मध अनेक वेळा फिल्टर केला जात असून, मध अधिक काळ टिकावा यासाठी यामधील यीस्ट काढून टाकले जाते. अनेक स्वस्त आणि हलक्या प्रतीचे ब्रँड, मध गोड असावा या करिता त्यामध्ये साखर देखिल मिसळतात. त्यामुळे मधाची गुणवत्ता कमी होते.

रॉ आणि रेग्युलर मधांपैकी, रॉ मध आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगला आहे. यामध्ये २२ तऱ्हेची अमिनो अॅसिड्स असतात. तसेच तीस निरनिराळ्या प्रकारचे अँटी ऑक्सिडंट्स रॉ मधामध्ये आहेत. त्यामुळे हृदयाशी संबंधित विकार टाळण्यास मदत होते. रेग्युलर मध हा अनेक वेळा प्रोसेस आणि फिल्टर केला जात असल्याने त्यातील पोषक द्रव्ये नष्ट होतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये रॉ मधाचा समावेश करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment