अमेरिकन शेअर बाजारामध्ये झालेल्या घसरणीचे पडसाद भारतीय बाजारात


मुंबई – अमेरिकन शेअर बाजारामध्ये सोमवारी झालेल्या घसरणीचे पडसाद मंगळवारी सकाळी भारतीय बाजारात पाहायला मिळाले. भारतीय बाजारही मंगळवारी सकाळी सुरु होताच कोसळला.

सेंसेक्स सकाळी १२०० अकांनी तर निफ्टीमध्ये ३५० अंकांची घसरण झाली. निफ्टी सध्या १०३८५ तर सेंसेक्स ३३८२१.२० असा आहे. दरम्यान अमेरिकेच्या बाजारातही काल सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. डाऊ जोन्स ११७५ अंकांनी घसरला. २००८ च्या आर्थिक मंदीच्या संकटावेळी डाऊ जोन्स ७७७.६८ ने घसरला होता. तर २०११ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.

Leave a Comment