बिटकॉइनने कमाई करणाऱ्यांना आता भरावा लागणार टॅक्स


नवी दिल्ली – सीबीडीटीचे प्रमुख सुशील चंद्रा यांनी मंगळवारी व्हर्च्यूअल करन्सी बिटकॉइनने कमाई करणाऱ्यांना आता टॅक्स द्यावा लागणार आहे. तसेच त्यावर टॅक्स दिला नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे म्हटले आहे. त्याचबरोबर यातून कमाई करणाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोतही सांगावे लागेल. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात बिटकॉइन करन्सी लीगल नसल्याचे म्हटले आहे.

१ फेब्रुवारीला अरुण जेटलींनी अर्थसंकल्प सादर केला. जेटलींच्या अर्थसंकल्पीय भाषणात क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख होता. जेटली म्हणाले होते, क्रिप्टोकरन्सी आणि कॉइनला सरकार कायदेशीर मानत नाही. ही करन्सी नष्ट करण्यासाठी पावले उचलली जातील. बेकायदेशीर कृत्यांमध्ये क्रिप्टो करन्सीद्वारे होणारे फायनान्स संपुष्टात आणले जाईल, त्यासाठी सरकार पावले उचलत आहे.

बिटकॉइनचे दर अर्थसंकल्पाआधी ११६८५ यूएस डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार ७,४९,४४६ रुपये होतात. पण अर्थसंकल्पाच्या दोन दिवसांनंतर त्याचे दर ८५७४ यूएस डॉलर्स एवढे झाले. भारतीय चलनानुसार त्याची किंमत ५,४९,९१४ रुपये आहे. या दरम्यान या करन्सीचे दर २७ टक्क्यांनी खाली आले आहेत.

Leave a Comment