मुंबई – आज अचानक राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाले असून ट्विटरने अकाउंट हॅक झाल्याचे समजल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या तिघांचेही अकाउंट सस्पेंड केले आहे.
अनुपम खेर, राम माधव यांचे अकाउंट हॅक
याबाबतची माहिती अनुपम खेर यांनी स्वतःच दिली. माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले असून सध्या मी लॉस एंजेलिसमध्ये आहे, भारतातील माझ्या काही मित्रांकडून मला याबाबत समजले, मी ट्विटरला याबाबत कळवले असल्याचे अनुपम खेर म्हणाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हॅकर्सनी स्वतःला तुर्की येथील असल्याचे म्हटले आहे. तुर्की येथील सायबर आर्मी आयदिस तिम द्वारा तुमचं अकाउंट हॅक करण्यात आले आहे. आम्ही तुमचा महत्वाचा सर्व डेटा मिळवला असल्याचे ट्विट हॅकर्सनी त्यांच्या अकाउंटवरून केले. पण ट्विटच्या अखेरीस ‘आय लव्ह पाकिस्तान’ असे लिहिण्यात आले आहे.