अजिनोमोटोचे सेवन आरोग्यास धोकादायक


मोनो सोडियम ग्लूटामेट, म्हणजेच अजिनोमोटो असे अॅडीइव्ह आहे, जे आपल्या खाण्यामध्ये वारंवार पॅकेज्ड फूड्स च्या द्वारे येत असते. तसेच रेस्टॉरंटमधील जेवणामध्ये देखील याचा सढळ हाताने वापर केला जातो. अजोनिमोटो पांढऱ्या रंगाचे असून जाडसर मीठाप्रमाणे दिसते. याच्या वापरामुळे अन्नाला एक वेगळी चव येते. चायनीज पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. पण याच्या वापराने आपल्या शरीरावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत असतात. डबाबंद अन्नाचे डबे, सॉसेजेस, चिप्स, इंस्टन्ट सूप्स, अश्या अनेक पदार्थांमध्ये अजिनोमोटोचा वापर करण्यात येतो. गर्भवती महिलांनी अजिनोमोटोचे सेवन पूर्णपणे टाळायला हवे. त्याचप्रमाणे वयस्क व्यक्ती आणि लहान मुलांनी ही याचे सेवन करणे टाळायला हवे.

अजिनोमोटोच्या सेवनाने मेंदूवर ड्रग्सच्या सेवनाने होतात, तसे दुष्परिणाम होऊ शकतात. अजिनोमोटोचे सेवन जर वारंवार केले जात असेल, तर याच्या सेवनाचे व्यसन लागते. अजीनोमोटो रक्तामध्ये आणि मेंदूमध्ये सहज शोषले जाते. याच्या अतिसेवनाने मेंदूतील चव आणि स्पर्शासाठी जबाबदार असणाऱ्या जीन्समध्ये परिवर्तन घडून येते.

नुकत्याच केल्या गेलेल्या रिसर्च नुसार संपूर्ण जगामध्ये हजारो टन अजिनोमोटो वापरले जाते. याच्या अतिसेवनाने मायग्रेन, चक्कर येणे, हार्मोन्सचे असंतुलन, जीव घाबरा होणे, अशक्तपणा, छातीमध्ये दुखणे अश्या तक्रारी उद्भवू लागतात. अजिनोमोटो आपल्या जीभेमध्ये असलेल्या रीसेप्टर्स ना इतके प्रभावित करतात, की हे वारंवार खाण्याचे व्यसन जडते. याच्या सेवनाने मधुमेह होण्याची शक्यता असते, तसेच यामुळे शरीरातील अॅड्रीनल ग्लँड व्यवस्थित काम करू शकत नाही. तसेच यामुळे उच्चरक्तदाब, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

ह्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी डबाबंद अन्नाचे डबे घेताना त्यावरील लेबल्स वाचून त्यामध्ये अजिनोमोटो नसल्याची खात्री करून घ्यावी. तसेच चायनीज पदार्थ बनविताना अजिनोमोटोचा वापर करू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment