या जागी गुरुत्वाकर्षणाची ऐशीतैशी


आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो व या मागे गुरुत्वाकर्षण हे कारण असते याची आपल्याला माहिती आहे. अगदी आपण पृथ्वीवर चिकटून राहू शकतो यामागेही गुरुत्वाकर्षण असते. मात्र आपल्या या ग्रहावर अशाही काही जागा आहेत जेथे गुरुत्वाकर्षण नियम लागू होत नाहीत. त्यामुळे या जागा पर्यटकांचे खास आकर्षण बनल्या असल्यात नवल नाही. अशाच काही जागांची ही माहिती


अमेरिकेतील सेंट इग्नस मिस्ट्री स्पॉट अशीच एक गूढ जागा आहे. या ठिकाणी १९५० मध्ये केल्या गेलेल्या सर्व्हेक्षण अहवालात असे नमूद आहे की येथील ३०० चौरस फुट भागात कोणतेही उपकरण काम करत नाही. येथे भिंतीवर खुर्ची ठेऊन माणूस बसू शकतो किंवा सरळ उभे राहू शकतो. कॅलिफोर्नियात सांताक्रूझ अशी आणखी एक जागा आहे. येथील जंगलात १५० चौरस फुट गोलाकार जागेत चुंबकीय क्षेत्र अनियमित आहे. त्यामुळे माणसे, वस्तू यांच्या आकारात बदल होतो.


आईसलंड व स्कॉटलंड याच्या मधील अटलांटिक महासागरात फॅरॉ बेटे आहेत. येथे धबधब्यातील पाणी खालून वर जातात दिसते. तर नेवादातील हूवर डॅम मध्ये बांधावर बाटलीतून पाणी ओतले तर ते खाली पडण्याऐवजी वर उडताना दिसते. असे म्हणतात येथे हवेचा वेग अधिक असल्याने पाणी वर उडते पण ते विज्ञानाने सिद्ध करता आलेले नाही.

भारताच्या लेह लदाख भागात छोटा चढ आहे. त्याला मॅग्नेटिक हिल म्हणतात. येथे बंद वाहने अपोआप चढावर चढतात. येथून विमाने उडतानाही अधिक उंचावरून उडविली जातात कारण येथे सिग्नल मध्ये गडबड होते असे सांगतात.

Leave a Comment