हजार डिझाईन बदलता येणारा डिजिटल नेकलेस


महिला वर्गासाठी ऑस्ट्रियाच्या स्टाईलेबल्स कंपनीने या नावाचा नेकलेस बनविला आहे. हा डिजिटल नेकलेस सर्वाथाने वेगळा आहे कारण एकतर तो स्मार्टफोनशी कनेक्ट करता येतो व हव्या त्या वेळी आपल्या कपड्यांना मॅचिंग होणारी डिझाईन निवडून ती डिस्प्ले करता येतात. इतकेच नाही तर या नेकलेस ला दिलेल्या साधारण दीड इंची स्क्रीनवर युजर महिला स्वतःचा फोटो डिस्प्ले करू शकते.

या नेकलेस मध्ये वेगवेगळी १ हजार डिझाईन आहेत. मेटल व प्लास्टर फ्रेम यासाठी दिली गेली आहे. हा नेकलेस सप्टेंबरमध्ये बाजारात येईल. याला दिलेला डिस्प्ले एलईडी स्क्रीन आहे. तो अॅडव्हांस ब्लूटूथ टेक्नोलॉजीने स्मार्टफोन अॅपशी जोडता येतो. कपड्यांच्या रंगानुसार डिझाईन निवडता येतात. याची बॅटरी १२ तास चालते. याची किंमत २४४ युरो म्हणजे १९ हजार रुपये आहे.

Leave a Comment