विवो व्ही 7 प्लसची व्हेलेंटाइन साठी विशेष लव्ह एडिशन


चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी विवोने या महिन्यात साजऱ्या होत असलेल्या व्हेलेंटाइन डे साठी इनफीनाइट स्पेशल लव्ह एडिशन बाजारात आणली आहे. लाल रंगाचा हा फोन डिझाईन करताना प्रसिध्द फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याचे सहाय्य घेतले गेले आहे असे समजते.

गडद लाल रंगाच्या या फोनच्या बॉर्डरवर गोल्ड फिनिशिंग आहे. अमेझॉनवर तो २२९९० रुपयात मिळणार असून ईएमआय वरही खरेदी करण्याची सुविधा दिली गेली आहे. या फोनला ५.९९ इंची स्क्रीन, युनीबॉडी डिझाईन, २४ एमपीचा सेल्फी तर १६ एमपीचा रिअर कॅमेरा, फेसब्युटी ७.० य पोर्टरेड मोड फिचर आहे. अनलॉक करतान फेस अॅक्सीस सह फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याची रॅम ४ जीबी व इंटरनल मेमरी ६४ जीबी आहे.

Leave a Comment