उत्तर प्रदेश सरकारने आखली गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना


लखनौ – गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना उत्तर प्रदेश सरकारने आखली असून त्याला उत्तेजनही दिले जाणार आहे. याबाबत माहिती देताना तेथील आयुर्वेद खात्याचे संचालक डॉ. आर.आर.चौधरी यांनी सांगितले, की गोमूत्रापासून आठ औषधे आमच्या विभागाने बनवली असून यकृत आजार, सांधेदुखी, प्रतिकारशक्तीची कमतरता यावर ती उपयुक्त आहेत. लखनौ व पीलभीत येथे राज्यातील आयुर्वेद विभागाचे दोन औषध प्रकल्प असून गोमूत्र, गाईचे दूध, तूप यापासून औषधे तयार तेथे केली जातात. राज्यात बांदा, झांसी, मुझफ्फरनगर, अलाहाबाद, वाराणसी,बरेली, लखनौ व पीलभित येथे आठ आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आयुर्वेदातील पदवी तेथे दिली जाते. हजारो रूग्ण रोज तेथे उपचारासाठी येत असतात. रोज सातशे ते आठशे रूग्ण लखनौ येथे आयुर्वेद रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये येतात. जर आठ रूग्णालयांची संख्या एकत्र केली तर रोज हजारो रूग्ण उपचारासाठी या रूग्णालयांमध्ये येतात.

चौधरी यांनी सांगितले, की आयुर्वेदाचा गोमूत्र हा एकात्म भाग आहे, गाईपासूनची इतर उत्पादनेही उपयोगी आहेत. यकृत आजार, सांधेदुखी, प्रतिकारशक्तीची कमतरता यावर गोमूत्रावर आधारित औषधे सध्या आम्ही देतो. त्यांचा वापर विस्तारण्याचा आता विचार आहे. दोनच औषध प्रकल्प ही औषधे उत्तर प्रदेशात तयार करतात त्यामुळे त्यांची संख्या वाढवण्यात येईल. या दोनच सरकारी कंपन्या आहेत, पण गोमूत्रापासून औषधे तयार करणाऱ्या खासगी कंपन्या अनेक आहेत. आयुर्वेद महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणही चालू करण्याचा विचार आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment