रिव्हर्स घेणारी ई स्कूटर – फ्लो


दिल्ली येथे होत असलेल्या ऑटोशो मध्ये एक वेगळीच स्कूटर शोकेस केली जात आहे. गुरुग्रं मधील स्टार्टअप कंपनी ट्वेंटीटू मोटर्स ने ही स्कूटर तयार केली आहे. फ्लो नावाची ही ई स्कूटर आहेच पण तिला रिव्हर्स ब्रेक दिला गेला आहे. आजपर्यंत आपण फ्रंट गिअर, अॅक्सिलेटर असलेल्या मोटरबाईक, स्कूटर पहिल्या आहेत. मात्र या स्कूटरला प्रथमच बॅक गिअर दिला गेला आहे.

ही स्कूटर व त्याचे तंत्रज्ञान मोबाईल अॅपशी जोडलेले आहे. त्यामुळे ती सहज ट्रॅक करता येते. स्कूटर मध्ये काही बिघाड झाला तर त्याचीही माहिती मिळते. या स्कूटरला २.१ किलो वॅटची मोटर दिली आहे य फुलचार्ज मध्ये ती ८० किमी जाते. ८५ किलो वजनाची ही स्कूटर १५० किलो वजन वाहून नेऊ शकते. तिचा स्पीड ताशी ६० किमी असून किंमत आहे ६० हजार रुपये. याशिवाय तिला क्रुझ कंट्रोल एलसीडी डिस्प्ले, कायनेटिक एनर्जी रिकव्हरी सिस्टीम अशी आधुनिक फीचर्स दिली गेली आहेत. एलईडी लाईट प्रोग्राम करण्याची सुविधा यात आहे.

Leave a Comment