फेसबुक सांगणार युजर गरीब कि श्रीमंत


फेसबुक त्यांचा युजर गरीब आहे, मध्यमवर्गीय आहे कि श्रीमंत आहे हे सांगणारे नवे तंत्रज्ञान विकसित करत आहे. यानुसार युजरची आर्थिक व सामाजिक स्थिती काय याची माहिती मिळू शकणार आहे. या नुसार कास्थ्कारी, मध्यमवर्गीय व उच्च अश्या श्रेणीत फेसबुकचे युजर विभागले जाणार आहेत. या तंत्रज्ञानाच्या पेटंट साठी अर्ज केला गेला असल्याचे समजते.

याचा मुख्य उपयोग जाहिरातदारांना होणार आहे. हि माहिती त्यांना त्याची उत्पादने कोणत्या श्रेणीसाठी आहेत व त्यांचे नक्की ग्राहक कोण याचा निर्णय करता येईल. यासाठी फेसबुक युजर कडून एक प्रश्नावली भरून घेणार आहे. त्यात वय, शिक्षण, इंटरनेटचा वापर किती, घर स्वतःचे आहे का, प्रवासाचे प्रमाण किती, कोणती व किती डिव्हाईस वापरता असे प्रश्न असतील. यात युजरच्या प्राप्तीसंबंधी माहिती विचारली जाणार नाही.

या प्रश्नावलीसाठी वयोगट केले गेले आहेत. २० ते ३० वयोगटाला कोणती डिव्हाईस वापरता व किती वापरता याची माहिती विचारली जाईल तर ३० ते ४० वयोगटाला घर आहे का याची माहिती विचारली जाणार आहे.

Leave a Comment