सोशल मिडिया क्षेत्रातील बडी कंपनी फेसबुकवर अंदाजे २० कोटी अकौंटस बनावट अथवा एकाच नावाने डुप्लिकेट अकौंट असावीत असे फेसबुकच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. अशी बनावट खाती मुख्यत्वे विकसनशील बाजारपेठ असलेल्या देशात अधिक प्रमाणात असून त्यात भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशांचा समावेश आहे असे समजते.
फेसबुकवर २० कोटी बनावट अकौंटस
फेसबुकच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणे ३१ डिसेम्बरपर्यंत फेसबुकवरील अॅक्टीव्ह युजर्सची संख्या २.१३ अब्जावर होती. २०१६च्या तुलनेत त्यात १४ टक्के वाढ झाली आहे. यात २०१७ च्या चौथ्या तिमाही पर्यंत अंदाजे १० टक्के अकौंटस बनावट आहेत.