बिटकॉइन गुंतवणुकीतून नफा कमावलेल्याना आयकर नोटीसा


बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करून त्यातून नफा कमावलेल्या लाखो भारतीयांना आयकर विभागाकडून कर भरावा यासाठी नोटीसा बजावल्या गेल्या आहेत. सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सचे परमुख सुशील चंद्रे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

चंद्रे म्हणाले भारत सरकारने बिटकॉइन मधील गुंतवणूक बेकायदा असल्याचे पूर्वीच जाहीर केले आहे तरीही लाखो लोकांनी यात गुंतवणूक केली आहे व त्यातून चांगली कमाई केली आहे. या कमाईवर कर भरलेला नाही. गतवर्षी डिसेंबरमध्ये भारतात बिटकॉइन एक्सचेंजचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यानुसार कर भरण्याच्या नोटीसा जारी केल्या गेल्या आहेत. यामुळे यंदा वर्षासाठी ठरविले गेलेले ९.८ लाख कोटी कर संकलनाचे उदिष्ट सहज पार करता येईल असा अंदाज आहे.

Leave a Comment