नोकियाने केली आपल्या ‘या’ दोन मॉडेलच्या किंमतीत मोठी कपात


मुंबई : आपल्या ग्राहकांसाठी नोकिया ५ आणि नोकिया ८ या स्मार्टफोनच्या किंमतीत नोकियाने मोठी कपात केली आहे. तब्बल ८ हजारांची कपात नोकिया ८ स्मार्टफोनच्या किंमतीत करण्यात आल्यामुळे ३६,९९९ रुपयांचा हा स्मार्टफोन आता २८,९९९ रुपयांना मिळणार आहे.

नोकिया ५ चे ३ जीबी व्हेरिएंट १३,४९९ रुपयांना लाँच करण्यात आले होते. पण हा फोन आता १२,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच यात १००० रुपयांची कपात करण्यात आली आहे. ५.३ इंच स्क्रीन नोकिया ८ मध्ये देण्यात आली असून यामध्ये स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर चिप आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ७.१ नॉगट या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल रिअर कॅमेरा असून दोन्हीचे रेझ्युलेशन १३ मेगापिक्सल आहे. तर फ्रंट कॅमेराही १३ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये हायब्रिड ड्युल सिम सिस्टमही देण्यात आले आहे.

तर ५.२ इंच स्क्रीन आणि ७२०x१२८० रेझ्युलेशन असणारा डिस्प्ले नोकिया ५ मध्ये देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लासही देण्यात आली आहे. यामध्ये १६ जीबी इंटरनल स्टोरेज असून एसडी कार्डने १२८ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते. १३ मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० चिपसेट असून यात २ जीबी रॅमही देण्यात आली आहे. तसेच यात फिंगरप्रिंट सेंसर होम बटनही देण्यात आले आहे.

Leave a Comment