बहुगुणकारी बेलपत्र


शिवाच्या पिंडीवर भक्ती भावाने चढविली जाणारी बेलपत्रे केवळ पूजेअर्चेसाठी वापरली जाताना आपण नेहमीच पाहतो. पण बेलपत्रे बहुगुणकारी असून याचे अनेकविध फायदे आहेत. बेलामध्ये प्रथिने, बीटा कॅरोटीन, थियामीन, कॅल्शियम, लोह अ,ब,क ही जीवनसत्वे आणि भरपूर मात्रेमध्ये ऑरगॅनिक कम्पाऊंड्स आणि अँटी ऑक्सिडंट्स आहेत. रुक्ष कोरड्या त्वचेला नितळ, सुंदर बनवायचे असो, किंवा राठ केसांना मुलायाम आणि चमकदार बनवायचे असो, या करिता बेलपत्र हा उत्तम पर्याय वापरता येऊ शकेल.

कित्येकदा चेहऱ्यावर असलेले डाग अनेक क्रीम्स किंवा लोशन्स वापरून देखील कमी होत नाहीत. या करिता बेलाच्या पानांचा रस थोड्या कोमट पाण्यामध्ये मिसळावा. त्यामध्ये थोडासा मध घालून ह्या मिश्रणाचे नियमित सेवन केल्याने रक्तशुद्धी होते. त्वचेवर असलेले पांढरे डाग बेलपानांचा लेप लावल्याने कमी होण्यास मदत होते. बेलाच्या पानांच्या रसामध्ये जीऱ्याची पूड मिसळून प्यायल्यास पित्त शमण्यास मदत होते.

बेलफळाची साल तिळाच्या तेलामध्ये घालावी, व त्यामध्ये कापूर घालावा, हे तेल दररोज केसांना लावल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. दररोज एक बेलपान खाल्ल्याने केसांची गळती कमी होण्यास मदत होते. पिकलेले बेलफळ मध आणि साखरेसोबत खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. जर शरीराला घामामुळे किंवा इतर काही कारणांमुळे दुर्गंधी येत असेल, तर बेलपानांचा रस सर्वांगाला लाऊन त्यानंतर सुमारे एका तासाने स्नान करावे. तसेच बेलफळ पाण्यामध्ये उकळून घेऊन त्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंड आले असल्यास कमी होते. तापामध्ये बेल्पानाच्या रसांच्या सेवनाने गुण येतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment