एसबीआय आणणार प्रथमच शेतकऱ्यांसाठी क्रेडीट कार्ड


भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाने केवळ शेतकऱ्यांसाठी विशेष क्रेडिट कार्ड सादर केले आहेत. सध्याच्या किसान क्रेडिट कार्ड्सच्या (केसीसी) विपरीत नवीन एसबीआय कार्ड शेतकऱ्यांना कमी व्याज दराने 40 दिवसांची मुदत मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड्समध्ये कर्जाची रक्कम लगेच खात्यातून डेबिट केली जाते.

सध्या, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये हा पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. एसबीआय क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना 40 दिवसांचे क्रेडिट मिळणार आहे. तसेच इतर एसबीआय कार्डांपेक्षा या कार्डवर व्याजाचे दर कमी असतील. कार्ड धारकांना या कार्डवरील क्रेडिट मर्यादेपैकी सुमारे 20टक्के रक्कम ग्राहकोपयोगी वस्तूंवर खर्च करता येईल, तर 80 टक्के रक्कम शेती उत्पादनांसाठी वापरण्याची मुभा असेल.

या योजनेअंतर्गत 100 अर्ज अगोदरच प्राप्त झाले आहेत, अशी माहिती एसबीआयच्या अध्यक्षांनी दिली.

Leave a Comment