विंटेज बाईकला लिलावात ६ कोटी किंमत


लास वेगास येथे नुकत्याच पार पडलेल्या विंटेज बाईक लिलावात १९५१ च्या ब्लॅक लायटनिंग या बाईकला ऐतिहासिक विक्रमी किंमत मिळाली. हि बाईक ९,२९,००० डॉलर्स म्हणजे तब्बल ६ कोटी रुपयांची किंमत मिळाली. यापूर्वी २०१५ साली १९१५ सालची बाईक ४.९ कोटी रुपयांना विकली गेली होती. अभिनेता स्टीव्ह मक्विन ने ती वापरली होती.

ब्लॅक लायटनिंग ही विक्रमी किमतीला विकली गेलेली बाईक जगातील या प्रकारच्या ३१ मॉडेल पैकी एक आहे. या मॉडेल ची विक्री १९४८ पासून सुरु झाली होती. कोणत्याही देखभालीशिवाय हि आजपर्यंत चांगल्या स्थितीत राहिली आहे. जॅक हॅटने ऑस्ट्रेलियात या बाईकच्या सहाय्याने लँड स्पीड रेकोर्ड नोंदविले होते. त्यावेळी ताशी २२० किमी च्या वेगाने ती चालविली गेली. १९४८ ते १९५२ या काळात हि सर्वात वेगवान बाईक होती. तिचा टॉप स्पीड होता २४१ किमी. या बाईक ला ९९८ सीसीचे एअर कुल्ड ओएच व्ही ट्वीन इंजिन दिले गेले होते. ६६ वर्षे जुनी ही बाईक प्रामुख्याने रेस मध्ये अधिक धावली आहे. तिचे रनिंग ८ हजार किमी. इतकेच झाले आहे.