आंधळ्यांचे गाव – टील्तेपक.


जगभरात अनेक वैशिष्ठे असलेली अनेक लहान मोठी गावे आहेत. मात्र एक गाव आहेही आहे जेथे केवळ माणसेच नाही तर प्राणीपक्षीही आंधळे आहेत. म्हणजे त्यांना डोळे आहेत पण ते पाहू शकत नाहीत. या गावाचे नाव आहे टील्तेपक. या गावात जोपाटेक समाजाचे लोक राहतात, ते रेड इंडिअन आहेत आणि त्याची संख्या आहे ३००.

असे समजते हे लोक जन्माच्यावेळी अगदी नॉर्मल असतात म्हणजे त्यावेळी त्याचे डोळे चांगले असतात. मात्र त्याचे वय वाढते तशी डोळ्यातील दृष्टी जाते. या गावात एकच रस्ता आहे व दोन्ही बाजूनी ७० झोपड्या आहेत. घरांना खडक्या नाहीत कारण त्यांना प्रकाशाची गरजच भासत नाही. हे लोक जमिनीवर झोपतात आणि बाजरी, मिरची असा आहार घेतात. ते लाकडाची अवजारे वापरतात. रात्रीच्या जेवणानंतर मद्यपान आणि नाच गाणी करतात.


या लोकांमध्ये असा समज आहे कि यांच्या आंधळेपणाला एक झाड कारणीभूत आहे. या झाडाकडे पहिले कि दृष्टी जाते. मात्र संशोधक हे मानायला तयार नाहीत. संशोधकांच्या मते या लोकांची दृष्टी जाण्यासाठी काळी माशी चावणे हे कारण आहे. झाडाकडे पहिल्याने दृष्टी जात असेल तर येथे बाहेरून येणारे प्रवासी, संशोधक यांनाही तोच अनुभव यायला हवा. तसे होत नाही. येथे आढळणाऱ्या काळ्या माश्या विषारी आहेत व त्या चावल्या कि एक प्रकारचा संसर्ग होऊन डोळ्याच्या नसा ब्लॉक होतात व त्यामुळे आंधळेपणा येतो.

Leave a Comment