असले टॅक्स कधी ऐकलेत?


कालच आपला अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला आणि नवीन कोणते कर लागू झाले याची एकाच चर्चा सर्व मिडिया वर सुरु झाली. जगातील प्रत्येक देशातील सरकारे किंवा राजे आपल्या सरकारचे उत्पन वाढविण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात कर आकारणी करत असतात. कर आकारणीच्या इतिहासात असेही कर लावले गेले आहेत ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यातील काही नमुने येथे देत आहोत.

इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याने १५३५ साली दाढीवर कर लावला होता. तो स्वतः दाढी ठेवत असे. तरीही हा कर त्याने लावला होता व त्याची कन्या एलिझाबेथ पहिली हिनेतर त्यापुढे जाऊन दोन आठवडे दाढी केली नाही तर कर लागू केला होता. अनेकदा असे दाधीबाज कर चुकविण्यासाठी घरातून बाहेर जात पण अश्यावेळी त्याच्या शेजाऱ्याकडून करवसुली केली जात असे. त्यामुळे दाढीवाल्यांवर शेजारी नजर ठेवत असत.


रशियाचा राजा पीटर द ग्रेटनेही युरोपीय देशातील लोकांप्रमाणे आपले लोक आधुनिक दिसावेत म्हणून दाढीवर कर लावला होता. जे हा कर भरत त्यांना टोकन दिले जात असे व ते सतत बरोबर बाळगावे लागे. त्याने आत्मा आहे असा ज्यांना विश्वास वाटतो त्या अत्म्यावारही कर लावला होता. ९ व्या शतकात रोम सम्राट ऑगस्टस याने बॅचलर म्हणजे अविवाहित राहणाऱ्यांवर कर लावला होता. लग्न केलेल्या पण मुले नसलेल्या जोडप्यानाही कर द्यावा लागत असे. २० ते ६० वयोगटासाठी हा कर होता.

इंग्लंड वेल्सचा राजा विलिअयम तिसरा याने खिडक्यांवर कर लावला होता. त्या मागे कारण होते राजाचा रोडावत चाललेला खजिना. खजिन्यात भर पदवी म्हणून हा कर लावला गेला होता. खिडकीवर कर लावण्यापूर्वी त्याने आयकर लागू करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला कडाडून विरोध झाल्यामुळे खिडकी कर लावला गेला. इटलीचा हुकुमशाह मुसोलिनी यानेही १९२४ मध्ये २१ ते ५० वयोगटातील अविवाहित पुरुषांवर कर लावला होता.

Leave a Comment