ट्रायने कमी केले ‘पोर्टेबिलिटी’चे दर


नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) पोर्टेबिलिटीचे दर कमी करण्याबाबतच्या मागण्या लक्षात घेऊन अखेर मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) दर कमी करण्याचा निर्णय घेतला असून निर्णयानुसार, हे शुल्क १९ रुपयावरुन ४ रुपये इतके करण्यात आले आहे. दर कमी करण्याच्या सूचना उद्योग क्षेत्रातील समभागदारांकडूनही मिळाल्या होत्या. ट्रायने हा निर्णय त्यानंतर घेतला आहे.

जारी केलेल्या निवेदनात ट्रायने म्हटले आहे की, या निर्णयाची अमंलबजावणी ट्रायकडून जाहीर करण्यात आलेल्या तारखेपासून होणार आहे. सरकारच्या एमएनपी अंतर्गत मोबाईल पोर्टेबिलिटीच्या सेवेत ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक कायम ठेवून दुसऱ्या ऑपरेटर कंपनीची सेवा घेणे शक्य होते.