‘नासा’चा अनेक दशके बेपत्ता उपग्रह सापडला


अमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेचा अनेक दशकांपासून बेपत्ता असलेला उपग्रह सापडल्याचा दावा संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे एका हौशी अंतराळवीराने या उपग्रहाचा शोध लावला आहे.

‘नासा’ने ‘इमेजर फॉर मॅग्नेटोपॉज-टू-ऑरोरा ग्लोबल एक्सप्लोरेशन’ (इमेज) हा कृत्रिम उपग्रह 2000 साली अंतराळात सोडला होता. त्याची मोहीम 2002 साली पूर्ण झाली होती मात्र 13 वर्षांपूर्वी त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटला होता. त्यामुळे तो अंतराळात हरविल्याचे मानले जात होते.

गेल्या 20 जानेवारी रोजी एका हौशी अंतराळवीराला हा उपग्रह सापडला असून ‘नासा’ ने त्याची खात्री केली आहे. हा उपग्रह निष्क्रिय मानल्याचे जात होते मात्र तो व्यवस्थित आणि सक्रिय असल्याचे आढळले आहे, असे ‘नासा’ने म्हटले आहे.

अमेरिकेच्याच ‘जॉन हॉपकिंस अॅप्लाईड फिजिक्स लॅब’ने या उपग्रहातून प्राप्त झालेला टेलीमेट्री डेटा एकत्रित करण्यात यश मिळविले आहे. यातून मिळालेला मूलभूत हाऊसकीपिंग डेटा वाचता येणे ‘नासा’ला शक्य झाले आहे, त्यामुळे त्याची मुख्य नियंत्रण प्रणाली सक्रिय असण्याची शक्यता कायम आहे.

‘नासा’च्या ‘गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर’मधील शास्त्रज्ञ आणि इंजीनियर उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न कायम ठेवणार आहेत जेणेकरून त्याची नक्की स्थिती शोधता येईल.

Leave a Comment