अर्थसंकल्प २०१८ : काय स्वस्त आणि काय महाग ?


नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला. शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागाल खूष करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडला पण त्याचवेळी टॅक्स स्लॅब म्हणजे कररचनेत कोणताही बदल न केल्याने नोकरदारांची निराशा केली आहे. १ टक्क्यांनी शिक्षण आणि आरोग्य अधिभारात वाढ केल्याने, प्रत्येक बिल वाढणार आहे. म्हणजे तुम्ही जे खरेदी कराल, त्या बिलावर १ टक्के अधिभार असेल. हा अधिभार पूर्वी ३ टक्के होता तो आता ४ टक्के असणार आहे.

सरकारकडून अर्थसंकल्पात एक मोठा बदल करण्यात आल्यामुळे मोबाइल, लॅपटॉप यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे महाग होणार आहेत. कारण, अर्थसंकल्पात मोबाइल फोनवरील कस्टम ड्यूटी वाढवण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पानंतर महाग झालेल्या वस्तू –
– शिक्षण आणि आरोग्यावरील सेस ३ वरुन ४ टक्क्यांवर, प्रत्येक बिल महागणार
– मोबाईलवरील कस्टम ड्यूटी १५ टक्क्यांवरून वाढवून २० टक्के करण्यात आल्याने आता मोबाईल महागणार
– सिगारेटसह तंबाखूजन्य वस्तू
– परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज
– आरोग्य सेवा स्वस्त
– कार आणि टू व्हीलर अॅक्सेसरीज
– सफोला तेल
– सिगारेट, विडी
– गॉगल्स
– मनगटी घड्याळं
– ऑलिव्ह ऑइल
– सिगारेट लायटर
– व्हिडिओ गेम्स
– फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस
– टूथपेस्ट, टूथ पावडर
– सौंदर्यप्रसाधनं
– ट्रक आणि बसचे टायर
– चप्पल आणि बूट
– सिल्क कपडा
– इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड
– फर्निचर
– घड्याळ
– एलसीडी, एलईडी टिव्ही
– दिवे
– खेळणी, व्हीडीओ गेम
– क्रीडा साहित्य
– मासेमारी जाळ
– मेणबत्त्या
– चटई
– काजू

स्वस्त झालेल्या वस्तू –
– सिल्वर फॉइल,
– पीओसी मशिन,
– फिंगर स्कॅनर,
– आइरिश स्कैनर,
– देशात तयार होणारे हिरे,
– सोलार बॅटरी
– ई-टिकटवरील सर्विस टॅक्स कमी,
– अनब्रँडेड डिझेल
– अनब्रँडेड पेट्रोल
– आरोग्य सेवा स्वस्त
– एलएनजी,
– प्रिपेएर्ड लेदर

Leave a Comment