अर्थसंकल्प २०१८ : दोन रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल


नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेल्या घोषणेमुळे पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे.

पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्यूटी घटवण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे पेट्रोल-डिझेल २ रूपयांनी स्वस्त झाले आहे. क्रूड तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने आणि भारतीय रूपयात आलेल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत आहेत. आयओसीच्या वेबसाईटवर मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत दिल्लीत पेट्रोलचे दर २.९५ रुपयांनी वाढले आहे. दरम्यान पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी सरकारने २ रूपयांनी घटवून ४.४८ रूपये प्रति लिटर केली आहे. तेच डिझेलवरील एक्साईज ड्युटी २ रूपयांनी घटवून ६.३३ रूपये प्रति लिटर केली आहे.

Leave a Comment