या देशांत भारतापेक्षा अधिक आयकर


आज संसदेत २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर होत आहे. यात सर्वसामान्य माणसाला वैयक्तिक आयकरात किती सवलत मिळणार याची अधिक उत्सुकता असते आणि यंदा आयकराची स्लॅब अडीच लाखावरून किमान ३ लाखावर नेली जावी अशी अपेक्षा केली जात आहे. भारतात आयकर आकारणीचे सर्वाधिक प्रमाण ३० टक्के आहे.

जगातील अनेक देशात भारतापेक्षा अधिक दराने वैयक्तिक आयकर आकाराला जातो. विकसित देशात हे प्रमाण अधिक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेत ४०६७५१ डॉलर्स च्या वर कमाई असेल तर टॉप मार्जिनल फेडरल कर आकारला जातो शिवाय प्रत्येक राज्याचा वेगळा कर भरावा लागतो. अमेरिकेत सरासरी ३९.६० टक्के कार आकारणी केली जाते. चीन मध्ये कमाईच्या ११ विविध श्रेणी आहेत व त्यानुसार कर आकारणी होते. येथे सरासरी कार ४५ टक्के इतका आहे. २०१७ मध्ये तो ४७ टक्के होता.

जपान मध्ये वल्डवाईड कमाईवर कर भरावा लागतो. अजपानी जपान मध्ये जितकी कमाई करतील त्यावर ५५.९५ टक्के दराने कर आकारला जातो तर जपानी बाहेरच्या देशातूनही कमाई करत असतील तर त्यावर वेगळ्या दराने कर भरावा लागतो. जर्मनीत रहिवाश्यांना ८८२० युरोपेक्षा अधिक कमाईवर कर द्यावा लागतो. या कमाईत शेती, व्यापार, स्वतंत्र प्रोफेशन, रोजगार, गुंतवणूक, भाडे, रॉयल्टी व अन्य स्रोतातून मिळणारी कमाई समाविष्ट असते. येथे साधारण ४७.५० टक्के असे कराचे प्रमाण आहे. इटली मध्ये नॅशनल, पर्सनल, म्युनिसिपल, रिजनल असे कराचे विविध प्रकार असून येथे वैयक्तिक कर ४८.८० टक्के आहे.

Leave a Comment