रस्त्याप्रमाणेच पाण्यावर धावणार ही बाईक


बाईक्स आणि स्कूटर रस्त्यावरून धावताना आपण नेहमीच पाहतो. गिब्स नावाच्या कंपनीने बिस्की नावाने एक आगळी दुचाकी तयार केली आहे. ही बाईक रस्त्यावरून धावतेच पण केवळ एक बटन दाबले की जेट स्की मध्ये रुपांतर होऊन पाण्यावरही धावू शकते.


या बाईकची लांबी २.३ मीटर आहे व रुंदी आहे १ मीटर. या सुपरबाईक साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. अर्थात हिची निर्मिती फन ड्रायविंगसाठी केली गेली आहे. रस्त्यावरून पाण्यात जाताना केवळ पाच सेकंदात चाके आत खेचली जातात व ती जेट रुपात येते तर पाण्यातून परत रस्यावर येताना ३ सेकंदात चाके बाहेर येतात. या बाईकचा जमिनीवरील वेग ताशी १४० किमी तर पाण्यातील वेग ताशी ६० किमी आहे. या बाईकला दोन सिलिंडर पेट्रोल इंजिन दिले असून चालकाला आराम मिळावा याची खास काळजी घेतली गेली आहे.

Leave a Comment