तब्बल ८ हजार रुपयांची लुंगी !


टविटरवर सध्या एका लुंगीची जोरदार चर्चा आहे. यामागे कारण आहे त्या लुंगीची किंमत. बाजारात झारा या फॅशन ब्रँडनी नवीन लुंगी आणली असून या लुंगीची किंमत ८ हजार २०० रुपये आहे.

झाराने फ्लोईंग स्कर्ट नावाखाली लाँच केलेले त्यांचे नवीन उत्पादन हे लुंगी आहे आणि ट्विटरवर या लुंगीची जोरदार चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खानने घातलेल्या लुंगीपासून ते गँग ऑफ वसेपुरमधल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचा लुंगीमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या लुंगीची ३०० रुपयांची लुंगी ८ हजाराला विकण्यावरून झाराची टिंगल उडवण्यात येत आहे.

Leave a Comment