१९८ रुपयांत व्होडाफोन देणार २८ दिवस १.४ जीबी डेटा


टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने प्रवेश केल्यापासून इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. ग्राहकांना जिओकडून मोफत इंटरनेट मिळत असल्याने इतर टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्लॅनमध्ये वारंवार बदल करावे लागत आहेत. आता आपल्या १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये व्होडाफोनने नुकताच एक बदल केला आहे. १९८ रुपयांमध्ये आता ग्राहकांना १.४ जीबी डेटा मिळू शकणार आहे. यासोबतच युजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल, रोमिंग कॉल आणि दिवसाला १०० एसएमएस फ्री मिळणार आहेत.

जिओ, एअरटेल, आयडीया आणि व्हो़डाफोन या कंपन्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार स्पर्धा सुरु आहे. व्होडाफोनने आता जाहीर केलेल्या प्लॅनची स्पर्धा एअरटेलच्या १९९ रुपये आणि जिओच्या १४९ रुपयांच्या प्लानशी आहे. ग्राहकांना या दोन्ही प्लॅनमध्ये इंटरनेट आणि इतर सुविधा देऊन खूश करण्यात येत आहे. ग्राहकांना व्होडाफोनच्या १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये आधी दिवसाला १ जीबी डेटा मिळत होता. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दिवसाला १०० मेसेजेस फ्री मिळत होते. दरम्यान या प्लॅनमध्ये कॉलसाठी दिवसाला २५० मिनिटे आणि आठवड्याला १००० मिनिटांची लिमिट ठरवण्यात आली असल्यामुळे व्होडाफोन ग्राहकांना जास्त इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे.

Leave a Comment