या महिलेला एक व्हिडीओ शेअर केल्यावर मिळतात १६ लाख रुपये


नवी दिल्ली – जर कोणतीही कला आत्मसात केली असेल तर तुम्ही अनेक मार्गाने पैसे कमावू शकता. आपण अनेकवेळा इंटरनेटमुळे एखादा झिरो हिरो झाल्याचे अनेक किस्से ऐकले असतील. पण इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून स्वीडन येथील रेशेल १६ लाख रुपये कमावते. तिच्यासारख्या या जगात अनेक महिला आहेत, ज्या सोशल मीडियामुळे महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहेत. जर तुमच्याकडे टॅलेंट असेल, तर या महिलांप्रमाणेच तुम्हीही इंटरनेटच्या माध्यमातून कमाई करू शकता.

या जगात रेशेलसारख्या अनेक महिला आहेत, सोशल मीडियावर ज्यांचे लाखो-करोडो फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्राम, यु ट्युब, टि्वटर आणि फेसबुकसारख्या माध्यमातून या महिलांनी स्वत:चे व्यवसाय उभारले. जगभरातील टॉप इन्फ्लुएन्सर्सची यादी फोर्ब्सने जाहीर केली.

योग गर्ल या नावाने स्वीडन येथील रेशेलला लोक ओळखतात. २०१३मध्ये सोशल मीडियामुळे या महिलेने आपली ओळख तयार केली. रेशेल म्हणते की, मी आजमितीस कुठेही आणि कधीही योगा विकू शकते. मी जे काही या जगात आहे त्याला कारण इन्स्टाग्राम असून मला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केल्यावर १६ लाख रुपये मिळतात.

२०१३ साली द बिकीनी बॉडी ट्रेनिंग नामक कंपनीची काईलाने स्थापना केली. या माध्यमातून ती आज १ कोटी महिलांशी जोडल्या गेली आहे. लोकांना वर्कआऊट आणि डाएटशी संबंधित मार्गदर्शन ती करते. इन्स्टाग्रामवर तिचे ६३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती २०१६मध्ये फोर्ब्सच्या यादीत टॉप ३०मध्ये होती.

Leave a Comment