४ वर्षे अगोदर गाठले सौरउर्जा उत्पादन ध्येय


केंद्रात २०१४ साली सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सौर ऊर्जेबाबत २०२२ सालापर्यंत ठरविलेले २० गिगावॉटचे ध्येय चार वर्षे अगोदरच गाठले गेले असल्याचे जाहीर केले गेले आहे. नॅशनल सोलर मिशन नावाने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. मोदी सरकारने सौर उर्जा निर्मितीस प्राधान्य देताना त्या दृष्टीने पावले टाकली होती. हे ध्येय वेळेपूर्वीच गाठले गेल्याने आता २०२२ पर्यंत १०० गिगावॉटचे नवे ध्येय ठरविले गेले आहे.

२०१६ मध्ये भारतात ६ मेगावॉट इतके सौर उर्जा उत्पादन होत होते. २०१७ मध्ये प्रथमच भारतात एकूण उर्जा उत्पादनात सौर उर्जा प्रमुख भागिदार बनली आहे. अर्थात सरकारने सौर उर्जा पॅनल आयातीवर आयातकर लागू केल्याने या क्षेत्रातील गुंतवणुकीत अनिश्चितता आली आहे व परिणामी २०१८ मध्ये सौर उर्जा उत्पादन काहीसे घटेल अशी भीती व्यक्त होत आहे. गुजराथ, राजस्तान व मध्यप्रदेशात सौर उर्जा उत्पादन वाढले असून मध्यप्रदेशात वर्षातील ३०० दिवस सौर दिवस आहेत परिणामी ते सौरउर्जा उत्पादन करणारे प्रमुख राज्य ठरले आहे.

Leave a Comment