विवो आणणार १० जीबी रॅमचा एक्सप्ले सेव्हन स्मार्टफोन


चीनी स्मार्टफोन उत्पादक विवोने जगातील पहिला डिस्प्लेच्या आत असलेला फिंगरप्रिंट सेन्सर फोन आणल्यानंतर आता पुढचे पाउल टाकले आहे. विवो त्यांच्या २०१६ मध्ये लाँच केलेल्या विवो एक्सप्ले ६ च्या पुढचे व्हर्जन विवो एक्सप्ले ७ आणत असून या फोनला १० जीबी रॅम दिली जाईल असे समजते. ऑनलाईनवर दाखविल्या गेलेल्या एका पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन स्लाइड मध्ये असे संकेत दिले गेले आहेत.

यामध्ये नवीन फोनची स्पेसिफिकेशन दिली गेली आहेत. त्यात हा फोन ड्युअल रिअर कॅमेरा सेट सह आहे. यालाही एक्स २० प्रमाणेच फिंगरप्रिंट सेन्सर डिस्प्लेखाली दिला जाणार आहे. फोनचा डिस्प्ले ४ के ओलेड असेल. स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर, १० जीबी रॅम, अशी त्याची अन्य फिचर असतील. हा फोन दोन व्हेरीयंट मध्ये म्हणजे १० जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज व ५१२ जीबी स्टोरेज मध्ये असेल. हा फोन बाजारात आला तर इतक्या मोठ्या रॅमचा तो पहिलाच स्मार्टफोन ठरेल.

Leave a Comment