दोन तोंडाची कार पहिलीत?


आपण निसर्गाच्या चुकीमुळे कधी कधी दोन तोंडाचा साप, दोन तोंडे असलेले जुळे असे चमत्कार पाहतो. पण इंडोनेशियातील ७१ वर्षीय रोनी गुनावान या मेकॅनिकने चक्क दोन तोंडाची कार तयार केली आहे. जगात या प्रकारची ही पहिलीच कार आहे. या कारची पुढची व मागची बाजू अगदी एकसारखी आहे. ती इतकी हुबेहूब आहे की कारचे तोंड नक्की कुठे हे ठरविता येत नाही. ही कार एकाचवेळी दोन चालक चालवू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार रोनीचे एक युनिक म्हणजे एकमेवाद्वितीय कार बनविण्याचे स्वप्न होते. त्यातून त्याला दोन तोंडाच्या कारची कल्पना सुचली. त्याने १० कामगाराच्या मदतीने सतत ६ महिने रात्रंदिवस काम करून या कारची निर्मिती केली. त्यासाठी त्याने टोयाटोच्या दोन लीम्बो कार मधोमध कापल्या व त्यांचे फ्रंट पार्ट अश्या खुबीने वेल्ड केले की ती एकाच कार वाटावी.

या कारला दोन इंजिन, दोन स्टीअरिंग, दोन पॅडल, २ गिअरसेट, १ गॅस टँक आहे. ही कार पार्क करताना सोपे जाते असा दावा केला जात आहे. १५ जानेवारीला रोनीने ही कार प्रथम रस्त्यावर आणली पण ती वाहतूक नियमाप्रमाणे नसल्याने पोलिसांनी ती लगेच जप्त केली. या कारचे डिझाईन मोटर नियमप्रमणे नाही असे कारण होतेच पण या कारला दोन रजिस्ट्रेशन नंबर, दोन नंबर प्लेट आहेत. पुन्हा ही कार रस्त्यावर आणायची नाही या अटीवर पोलिसांनी जप्त केलेली कार मालकाला परत केली असल्याची समजते.

Leave a Comment