या मंदिरात भग्न मूर्तींची होते पूजा


भारतात हजारोनी मंदिरे आहेत व प्रत्येक मंदिरातील मूर्तींची तेथील प्रथेप्रमाणे पूजा अर्चा केली जात असते. अर्थात कुठेही भग्न मूर्ती पुजल्या जात नसल्या तरी उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ येथे असलेल्या प्राचीन अष्टभुजा मंदिरात मात्र भंगलेल्या मूर्तींची पूजा केली जाते. भारतीय पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार हे मंदिर ११ व्या शतकातले असून सोमवंशी क्षत्रिय राजांनी ते बांधले असावे.

या मंदिराची अशी कथा सांगितली जाते की १६९९ मध्ये औरंगजेबाने सर्व हिंदू मंदिरे फोडण्याचा आदेश दिला होता त्यानुसार या मंदिरावरही मोगल चालून आले. पण मंदिराचे रक्षण करण्यासाठी येथील पुजाऱ्यांनी मंदिराचे मुख्य दर मशिदीप्रमाणे बनविले. मात्र घंटा काढली गेली नाही. त्यावरून मोगल सरदारला शंका आली व त्याने शिपायांना आत घुसण्याचा आदेश दिला. शिपाई आत घुसले व त्यांनी येथील मूर्तींची डोकी उडविली. तेव्हापासून या मूर्ती याच अवस्थेत आहेत व त्याच अवस्थेत पुजल्या जातात.

मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुरेख कोरीव काम आहे. तसेच खजुराहो मंदिरातील कोरीव कामाशी जुळते येथील काम आहे. गेटवर एक लेख असून तो कोणत्या भाषेत असावा याचा निर्णय करता आलेला नाही. रामायण, महाभारताचा या मंदिराशी संबंध आहे. येथे रामाने येथे बेलाभवानीची पूजा केली होती असा समज आहे. तर भीमाने येथे बकासुराचा वध करून भयहरणनाथ महादेव लिंगाची स्थापना केली होती असे मानले जाते.

Leave a Comment