मासाहारी लोकांसाठी विशेष खाद्य अशी ओळख मिळविलेला कडकनाथ कोंबडा आता पुढील संशोधनासाठी भाभा अॅटोमिक संशोधन केंद्रात दाखल झाला असल्याचे समजते. येथे कडकनाथवर संशोधन करून त्याची मासावर प्रकिया करून सूप, मासांचे क्यूब, हाडांसह कच्चे मांस वाळवून त्यापासून चिकन करी असे पदार्थ तयार केले जाणार आहेत. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ रायपुरच्या कांकेर येथील कृषी संशोधन केंद्रातून २५ कडकनाथ कोंबड्या भाभा मध्ये पाठविल्या गेल्या आहेत.
कडकनाथ भाभा अॅटोमिक संशोधन केंद्रात दाखल
विद्यापीठाचे कुलपती एस.के.पाटील म्हणाले गेल्या आठवड्यात या संबंधीचा करार केला गेला. कडकनाथ कोंबडी अंडी देते पण ती उबवत नाही. त्यासाठी विशेष इनक्युबेटर वापरावे लागतात. ही अंडी व मांस विशेष पोषक व कमी चरबीचे तसेच प्रोटीन व आयर्नने परिपूर्ण आहे. ते महाग आहेच पण त्याला मागणीही चांगली आहे. ही कोंबडी नेहमीच्या कोंबडीपेक्षा वजनाला तिप्पट आहे. ग्रामीण भागातील कोंबडीपालन करणारे तसेच शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून कडकनाथ पालन फार उपयुक्त ठरते आहे. त्यामुळे त्याचे फास्टफूड च्या धर्तीवर रेडी टू कूक पदार्थ बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.