वयाच्या चौथ्यावर्षी प्रसिद्धीच्या झोतात आलेली थाईनेल आता अमेरिकन कंपनीसाठी मॉडेलिंग


जगातील सर्वात सुंदर मुलगी म्हणून वयाच्या चौथ्या वर्षीच प्रसिद्धीच्या झोतात आलेली थाईलेन ब्लॉन्डेऊ पुन्हा एकदा चर्चेत आली असून थाईलेन आता १६ वर्षांची झाली आहे आणि ती अमेरिकेची कंपनी जूसी कुटूरसाठी मॉडेलिंग करणार आहे. थाईलेन हिने नव्या कंपनीसाठी पिवळ्या ट्रॅक सूटमधील फोटो पोस्ट केला आहे.

आता १६ वर्षांची फ्रान्सची मॉडेल थाईलेन झाली असून टीव्ही प्रेझेंटरची मुलगी असलेली थाईलेन चार वर्षांची होती तेव्हा रॅम्पवर उतरली होती. लहानपणापासूनच थाईलेन हिला मॉडेलिंगची आवड आहे. एवढ्या कमी वयात थाईलेन रॅम्पवर उतरली तेव्हा जगभरात तिचे फोटो प्रसिद्ध झाले होते. तिच्या सुंदरतेची तेव्हा खूप चर्चा झाली होती.

थाईलेन हिला ‘जेलोस’ या मॅगझिनने जगातील सर्वात सुंदर मुलगी हा किताब दिला होता. थाईलेनच्या कुटुंबियांवर त्यानंतर अनेक आरोप झाले होते. पण सर्व आरोपांकडे त्यांनी दुर्लक्ष करत मुलीला तिच्या आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. १० वर्षांची होती तेव्हा थाईलेनने Vogue मॅगझिनने एक फोटोशूट केले होते. तेव्हा मॅगझिनवर ब्लॉन्डेऊच्या फोटोला सेक्शुअलाइज केल्याचा आरोप झाला होता.

इन्स्टाग्रामवर थाईलेन अॅक्टिव्ह असते. तिचे १९ लाख फॉलोअर्स आहेत. अमेरिकन कंपनी जूसी कुटूरसोबत काम करण्यास सुरुवात केल्यानंतर तिने फोटो शेअर केला आहे.