अमेझॉनचे निसर्गाला जवळ घेणारे कार्यालय


जगातील नंबर वन ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने त्यांचे ४ अब्ज डॉलर्स खर्चून बांधलेले नवे कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे विशेष म्हणजे ते आधुनिक आहेच पण तरीही निसर्गाच्या अगदी जवळ आहे. कार्यालयातील कर्मचारी काम करताना, जंगल, झुळझुळ वाहणारे झरे, दाट उंच झाडे याच्या सहवासात काम करणार आहेत.

या कार्यालयाच्या इमारतीत तीन मोठ्या गोल इमारती आहेत. त्यातील सर्वात मोठी ९० फुट उंच आहे. सीएटल येथील या कार्यालयात वर्षावन उभारले गेले असून तेथे ४ हजार झाडे आहेत. चारीबाजूने हिरवळ, वाहत्या पाण्याचे आवाज यामुळे जंगलात असल्याचा फील येतो. या इमारतीत ८०० कर्मचारी काम करत आहेत. ५५ फुट उंचीचे १९६९ साली लावलेले एक प्रचंड झाड येथे क्रेनच्या सहाय्याने आणून पुन्हा लावले गेले आहे.

या कार्यालयाला २६०० ग्लास पॅनल आहेत. यामुळे सूर्यप्रकाश आत येऊन झाडांना मिळतो पण बाहेरची उष्णता आत येत नाह

Leave a Comment