५ जी मोबाईल साठी ओप्पोचा क्वालकॉम सोबत करार
चीनी मोबाईल उत्पादक कंपनी ओप्पोने त्यांच्या ५जी मोबाईल साठी जागतिक चीप निर्माती कंपनी क्वालकॉम बरोबर सहकार्य करार केला आहे. चीनमध्ये आयोजित २०१८ क्वालकॉम टेक दिवसाच्या दिवशी ही घोषणा करण्यात आली.
ओप्पोचे सीईओ टोनी चेन यावेळी बोलताना म्हणाले, कंपनी नजीकच्या काळात ५ जी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे व त्याचा वापर ग्राहकांच्या गरजेनुसार केला जाणार आहे. २०१९ मध्ये ओप्पो ५ जी मोबाईल बाजारात आणत आहे. तत्पूर्वी २०१८ मध्ये जपानी बाजारपेठेत जम बसविला जाणार आहे. चीनने जगभर फोन विक्रीमध्ये नंबर वन राहून ४५.९ कोटी हँडसेट विक्री केली असली तरी आता या विक्रीत ४ टक्के घट नोंदविली गेली असल्याचे नुकतेच समोर आले आहे.