मोटोरोलाचा ६ जीबी रॅमचा मोटो एक्स ४ भारतात आला


मोटोरोलाने त्यांच्या मोटो एक्स ४ चे पॉवरफुल व्हेरीयंट भारतात लाँच केले आहे. हा फोन ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज सह असून त्याची मेमरी कार्डच्या सहाय्याने २ टीबी पर्यंत वाढविता येणार आहे. हा फोन २४९९९ रुपयात उपलब्ध आहे व ३१ जानेवारीपासून तो फ्लिपकार्ट व मोटो हब वर विक्रीसाठी येणार आहे.

मोटो एक्स ४ चे ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज व ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज ची व्हेरीयंट गेल्या नोव्हेंबर मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. त्यांच्या किमती अनुक्रमे २०९९९ व २२९९९ अश्या होत्या.

नवीन व्हेरीयंट मध्ये ५.२ इंची आयपीएस एलसीडी स्क्रीन, ड्युअल रिअर कॅमेरा, अँड्राईड ८.० ओरिओ, ग्राफिक साठी अँड्रेन ५०८ दिला गेला आहे. कॅमेरे १६ व ८ इम्पिचे आहेत. हा फोन धूळ व पाणी प्रतिरोधक आहे.

Leave a Comment