भारतात मुळातच मंदिर देवळांची वानवा नाही. मात्र सर्वसाधारणपणे देवदेवतांची मंदिरे, देवळे बांधली जातात. गुजराथच्या खेद जिल्ह्यातील नेनपूर येथे २०१० साली एका वेगळ्याच मंदिराची उभारणी केली गेली आहे. या मंदिरात भाविकांची गर्दी वाढत चालली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर कुणा देवतेचे नाही तर ते आहे चेटकिणीचे मंदिर. आजच्या हायटेक जमान्यात असे मंदिर बांधले जाते व तेथेही भाविक गर्दी करतात हेच याचे विशेष.
नेनपूर गावात आहे चेटकिणीचे मंदिर
असे सांगतात या रस्त्यावर रोज अपघात होत असत. त्यामुळे लोक या रस्त्याचा वापर करायला घाबरायचे. काही जणांच्या मते भूतप्रेताच्या प्रभावामुळे अपघात होत असावेत. त्यातून रस्त्याकडेच्या झाडांवर साड्या बांधायची सुरवात झाली. व त्यातूनच चेटकीण मातेचे मंदिर बांधण्याची कल्पना पुढे आली. झाडांवर साड्या दिसू लागल्या की मंदिर जवळ आल्याची खुण पटते. विशेष म्हणजे हे मंदिर बांधल्यानंतर येथे अपघात झालेले नाहीत. हा चमत्कार मनाला जातो व त्यामुळेच येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.