ट्विटरवर बनावट फॉलोअर देणाऱ्या कंपनीची चौकशी


ट्विटर या सोशल साईटवर बनावट फॉलोअर विकणाऱ्या कंपनीची चौकशी सुरु झाली असल्याचे समजते. न्युयोर्क टाईम्सच्या बातमीनुसार ऐरिक श्नायडर यांनी देवूमी कंपनीने लाखो लोकांची ओळख चोरल्याचा आरोप केला आहे व या कंपनीने अनेक लोकांच्या मुलाखती प्रकाशित करून त्यांच्या सोशल मिडिया खात्यांची माहिती, प्रोफाइल फोटो कॉपी करून खरा वाटणारा बोट तयार केला आहे.

बोट हा असा प्रोग्रम असतो कि तो अॅटोमेटीकली चालतो व ट्विटर तसेच अन्य सोशल मिडिया साईटवर लाईक, रीट्वीट सारखी कामे दीर्घकाळ करत राहतो. आपली लोकप्रियता वाढविण्याची गरज असलेले राजकारणी, उद्योगपती, अभिनेते असे लोक पैसे देऊन बोट सेवा खरेदी करतात. सोशल मिदियावरील लोकप्रियतेचा प्रभाव जनमानसावर तसेच लोकशाहीवर पडत असतो. देवूमी कंपनीने असे अडीच लाख बोट विकल्याचा द्वाद केला होता. ही कंपनी नोंदणीकृत आहे. टाईम्स च्या दाव्यानुसार कमानीची नोंदणी न्युयोर्कची असली तरी तिचे कार्यालय फ्लोरिडा येथे य साम्राचारी फिलिपिन्स मध्ये आहेत. या कंपनीकडे ३५ लाख बोट्स आहेत व त्यांची वारंवार विक्री केली जाते.

Leave a Comment