आपले करियर सुधारण्याकरिता करा सोशल मिडीयाचा वापर


आजकाल क्वचितच अशी व्यक्ती असेल, जी सोशल मिडियावर नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी, आपल्या आयुष्यातील विशेष प्रसंग, याचा उल्लेख आपण सर्वच जण सोशल मिडीयावर आवर्जून करीत असतो. पण हेच सोशल मिडिया आपल्या करियर मध्ये आपल्याला चांगल्या संधी मिळण्याकरिता देखील आपल्याला वापरता येऊ शकते.

सोशल मिडीयावर आपल्या करियर साठी संधी शोधत असताना, योग्य सोशल वेबसाईट्स निवडणे अतिशय महत्वाचे आहे. या वेबसाईट्स वरून आपल्या प्रोफाईल रिक्रूटर्स पाहू शकतात. तुमच्या इतर सोशल मिडियावरील प्रोफाइल्स देखील रीक्रूटर्स पहात असतात. तेव्हा आपल्या सोशल मिडियावरील पोस्ट्स किती आहेत, या पेक्षा कश्या प्रकारच्या आहेत या कडे लक्ष द्यावे. तुमचे सोशल मिडिया अकाउंट एक प्रकारे तुमच्या व्यक्तिमत्वाचा परीचय देणारे असते. त्यामुळे आपल्या सोशल पेज वरील पोस्ट्स बाबतीत काळजी घ्यावी. तसेच तुम्ही सध्या करीत असलेल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमधील आपली यशाच्या प्रत्येक पायरीचा उल्लेख मात्र अवश्य करावा. त्याद्वारे व्यावसायिक क्षमता कळून येण्यास मदत होते.

जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, तर त्याकरिता सोशल मिडियावर स्वतंत्र पेज बनवा, आणि आपल्या वैयक्तिक पेज पासून हे पेज वेगळे ठेवावे. व्यवसायानिमित्त सुरु केलेल्या पेजद्वारे तुम्हाला तुमच्या प्रमाणेच इतर व्यावसायिकांच्या संपर्कात राहता येणे शक्य होते. या द्वारे तुमच्या व्यवसायाला फायद्याच्या ठरणाऱ्या अनेक संधी मिळू शकतात. तसेच तुमचे व्यवसायाचे क्षेत्र वाढण्यास मदत करू शकणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहणे, तुम्हाला तुमच्या पेजद्वारे शक्य होईल. तसेच या पेज वर वैयक्तिक घडामोडींची चर्चा करणे टाळा.

Leave a Comment