‘हा’ गोलंदाज तब्बल ७ वर्षे करत होता शेतात सराव, आयपीएलमध्ये लागली ६ कोटींची बोली


चंदीगड – फिरकीपटू युजवेंद्र चहलला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरने सहा कोटींना विकत घेतले असले, तरी त्याचा येथपर्यंत पोहचण्याचा प्रवास अतिशय खडतर होता. हरियाणामधील जिंद जिल्ह्याचा रहिवाशी आहे भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल. आयपीएल २०१८ च्या लिलावात तरुण फिरकी गोलंदाज युजवेंद्रची मूळ किंमत ही २ कोटी होती, पण युजवेंद्रला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने तब्बल ६ कोटी रुपये देऊन खरेदी केले आहे.

दरम्यान युजवेंद्रच्या खडतर प्रवासाबाबत त्याच्या आईने सांगितले कि, अभ्यासात युजवेंद्रच लक्ष लागत नसे, कदाचित हेच कारण होते की त्याने क्रिकेट खेळण्याची त्यांची इच्छा आमच्याकडे व्यक्त केली आणि तेव्हा आम्ही ती पूर्णही केली. चहलचे वडील केके म्हणतात की, मी युजवेंद्रसाठी २००४ मध्ये दीड एकर शेतात एक मैदान तयार केले, त्याने तेव्हापासून तिथे आपला सराव सुरू केला. युजवेंद्र २०११ पर्यंत त्याच शेतात सराव करीत होता. के.के. दीर्घ श्वास घेवून सांगतात की १९ वर्षांखालील भारतीय संघात युजवेंद्रची निवड झाली तेव्हा त्यांना वाटले की आता आपले स्वप्न पूर्ण होईल. त्यानंतर रणजी ट्रॉफी, आयपीएल आणि नंतर भारतीय क्रिकेट संघात निवड होईपर्यंत, युजवेंद्र चहलने कधीही मागे वळून पाहिले नाही.

Leave a Comment