नासाचे माणसाला मंगळावर नेणारे रॉकेट तयार


अमेरिकन अंतराळ संस्था नासा ने मानवाला मंगळावर घेऊन जाण्यास उपयोगी पडणारी रॉकेट स्पेस लाँचर सिस्टीम तयार झाली असल्यःची घोषणा केली आहे. पुढील वर्षी त्याच्या चाचण्या सुरु होत आहेत मात्र त्यावेळी त्यातून माणसे पाठविली जाणार नाहीत. ओरीयन स्पेस क्राफ्टची ही पहिली मोहीम असेल.

या रॉकेट चे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे खर्चात बचत होऊ शकणार आहे. त्यासाठी थ्री डी प्रिंटेड परत वापरले जाणार आहेत. २०३० मध्ये या यानातून माणसे मंगळावर पाठविली जातील असे समजते. या आरएस २५ रॉकेट साठी ३८० कोटीचा खर्च आला असून भविष्यात हा खर्च ३३ टक्क्यांनी कमी होईल असे सांगितले जात आहे. चार टन वजनाचे हे रॉकेट ७७ तन वजनासह अंतराळात झेपाऊ शकेल.

Leave a Comment