कनूर जेलमधील सुगरण बल्लवाचार्य

आपल्याकडे चविष्ट स्वयंपाक करणाऱ्या महिलेले सुगरण म्हटले जाते तर पुरुष स्वयंपाक्याला आचारी किंवा बल्लवाचार्य म्हटले जाते. केरळ मधील कनूर जेल मध्ये अश्या बल्लवाचार्यांनी बनविलेल्या पदार्थांना बाहेरून इतकी मागणी आहे की गेल्या वर्षात या जेलला या उद्योगातून तब्बल ३ कोटींची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे तुरुंगातील अन्नाबद्दल जनमानसात जे समज आहेत त्याला या बल्लवाचार्यांनी त्यांच्या पाककौशल्याने खोटे ठरविले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कनूर जेल मध्ये हा अनोखा प्रयोग २०१२ पासून सुरु झाला. येथे शिक्षा भोगान्रे १२०० कैदी आहेत. त्यातील ज्यांना उत्तम पदार्थ बनविता येतात त्यांच्याकडून पोळ्या, बिर्याणी, लाडू, चिप्स असे पदार्थ बनवून ते फ्रीडम फूड या ब्रांड खाली बाजारात विक्रीसाठी येतात व या पदार्थांना प्रचंड मागणी आहे. जेल चे अनेक आउटलेट या पदार्थांची विक्री करतात. कैद्यांना या कामासाठी रोज २०० रु.मजुरी मिळते. ज्यांना बेकरी ची माहिती आहे ते कैदी ब्रेड, केक, बिस्किटे बनवितात. बाजारातील किमतीच्या तुलनेत हे पदार्ध स्वस्त दरात विकले जातात. गेल्या सहा वर्षात यातून जेल ला ८.५ कोटींची कमाई झाली आहे.

या जेलमध्ये गतवर्षी श्रीलंकेतील कैदी आणि अन्य ५ तुरुंगातले निवडक कैदी यांच्यात टी २० सामना खेळविला गेला होता. देशात सर्वाधिक कमाई करणारा तुरुंग तिहार असून येथील वर्षाची उलाढाल ४० कोटी य निव्वळ नफा १५ कोटी असल्याचे समजते. या तुरुंगातील उत्पादने टीजे ब्रांड खाली विकली जातात.

Leave a Comment