गुजराथमधील डाकोरजी मंदिर हे भारतातील प्रसिध्द तीर्थस्थळ आहे. या मंदिरातील अतिशय सुंदर कृष्णमृति रणछोडदास नावाने ओळखली जाते. या मूर्ती मागे एक रोचक कथा आहे. असे सांगतात की डाकोर मध्ये राहणारा बाजेसिंग राजपूत कृष्णाचा परमभक्त होता. त्याच्या हातावर तुळशीची रोपे उगवत असत आणि ही तुळस तो द्वारकेला जाऊन कृष्ण मूर्तीला अर्पण करत असे. बाजेसिंग कालांतराने म्हातारा झाला तेव्ह्या द्वारकेला जाणे त्याला जमेना. कृष्णाने त्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला व द्वारका मंदिरातील मूर्ती डाकोर येथे घेऊन जाण्यास सांगितले.
डाकोर मंदिरातील कृष्ण मूर्तीचे रहस्य
बाजेसिंग स्वप्नात दिसल्याप्रमाणे द्वारकेत आला व मूर्ती घेऊन गेला. सकाळी जेव्हा पुजारी लोकांना मूर्ती दिसली नाही तेव्हा शोध सुरु झाला. मूर्ती डाकोरने नेऊन सरोवरात टाकली असल्याचे समजल्यावर तेथे भले घेऊन शोध सुरु झाला. भाल्याचे टोक मूर्तीला टोचून तेथे मूर्तीला खोक पडली व आजही ते निशाण मूर्तीवर आहे.
ही मूर्ती अतिशय देखणी आहे. हातात शंख, चक्र असून ती काळ्या दगडात बनविली गेली आहे. या ठिकाणी गौतमी तलाव, डंकनाथ महादेव मंदिर, बाजेसिंग मंदिर अशी अन्य मंदिरे आहेत. भगवान भाक्तासह विराजमान आहे हेच या मंदिराचे खास वैशिष्ठ आहे. येथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते.