या महिलेने २ वर्षात दिला ५ मुलांना जन्म


सध्या आपल्या प्रेग्नेंसीमुळे ब्रिटनच्या ३७ वर्षीय लीन शेलटन चर्चेत असून २ वर्षांत ५ मुलांना लीनने जन्म दिला आहे. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. लीन आणि तिचा पति यांनाही हे सर्व झाल्यानंतर विश्वास बसत नाही.

लीनचे पती ४७ वर्षीय ग्राहमने सांगितले की, सर्वात अगोदर २०१४ मध्ये त्यांची पत्नी गरोदर होती. तेव्हा त्यांनी एका बाळाला जन्म दिला. यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये या जोडप्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. लीन पुन्हा गरोदर होती आणि यावेळी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. ग्राहमने सांगितले की, ३ मुलं झाल्यानंतर आम्ही विचार केला की, आता कुटूंब पुर्ण झाले. परंतू जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर १४ आठवड्यांनी लीन पुन्हा गरोदर प्रेग्नेंट राहिली आणि यावेळी आम्ही जे पाहिले त्यावर आम्हाला विश्वास बसला नाही. यावेळी सोनोग्राफीमध्ये समजले की, ती पुन्हा जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. हे कसे शक्य आहे? लीनच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांना सुपर फर्टाइल मॉमच्या नावाने ओळखले जात आहे.

लीन सांगते की, २४ तास आमच्या घरात आवाज सुरु असतो. सर्व मुलांना एकत्र सांभाळणे सोपे नसते. आम्ही प्रत्येक आठवड्यात त्यांच्यासाठी १५० नॅप्पी, अनेक लीट दूध आणि खाण्याच्यापिण्याच्या वस्तू खरेदी करव्या लागतात. यावर आमचे २२० पाउंड (20 हजार) खर्च होतात. परंतू यांना सांभाळताना आम्हाला खुप मजा येते.

Leave a Comment