भारतातील पहिला तरंगता बाजार कोलकातामध्ये झाला सुरू


कोलकाता – भारतातील पहिला तरंगता बाजार पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या पतुली भागामध्ये सुरू करण्यात आला असून हा अभिनव बाजार कोलकाता महानगर विकास प्राधिकरणाने पटुळीतील तलावातच सुरू केला आहे. येथे दुकानदार फळे, भाज्या, मत्स्य आणि इतर उत्पादनांची विक्री करतील.

या तरंगत्या बाजाराचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्घाटन केल्यानंतर पर्यटकांची या तरंगत्या बाजारात गर्दी वाढत आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचे दर इतर बाजाराप्रमाणेच कमी आहेत. येथे सध्या फक्त फळे, भाज्या आणि मासे उपलब्ध होत आहेत. आम्हाला आशा आहे की भविष्यात अधिक गोष्टी देखील येथे मिळतील, असे मत एका पर्यटकांने व्यक्त केले.

Leave a Comment