शिक्षेनंतर थेट अभियांत्रिकी पदवी घेऊनच बाहेर पडला कैदी


भोपाळ – भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटलेला एक कैदी शिक्षेनंतर थेट अभियांत्रिकी पदवी घेऊनच बाहेर पडला असून अनेकांना त्याचा हा कायपालट थक्क करणारा वाटत आहे.

रागाच्या भरात एकाचा भोपाळ तुरुंगातून सुटलेल्या रामकृष्ण काळुराम या कैद्याने खून केला होता. मध्य प्रदेशमध्ये दरवर्षी २६ जानेवारीला चांगली वर्तणूक असणाऱ्या कैद्यांची शिक्षा माफ केली जाते. रामकृष्ण या कैद्याची त्यामध्ये ६ वर्षांची शिक्षा माफ करण्यात आल्यामुळे हा कैदी कुटुंबियासमवेत राहू शकणार आहे. या कैद्याची प्रजासत्ताक दिनाला सुटका झाली, तेव्हा त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आले.

आपले शिक्षण व्यवसायाने शिक्षक असणारे रामकृष्ण काळुराम याने तुरुंगातही सोडले नाही. त्याला तुरुंगात आल्यानंतर पश्चाताप झाला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आसाम विद्यापीठातून त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. त्याच्यासोबत असलेल्या काही कैद्यांनी संगणक पदविका मिळविली. तर काही जणांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. रामकृष्ण हा तुरुंगात राहून कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याचबरोबर प्रकाश रेयकवार या कैद्याची वर्तणूक चांगली असल्याने त्याचीही मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. सुटकेनंतर शेती करणार असल्याचे रेयकवार याने सांगितले आहे.

Leave a Comment