कॅलिफोर्नियाची एक मांजर एका झटक्यात झाली कोट्याधीश


कॅलिफोर्नियाची एक मांजर एका झटक्यात कोट्याधीश झाली असून यामागचे कारण म्हणजे, ही मांजर एका न्यायालयीन खटल्यामध्ये जिंकली आहे. ग्रांपी कॅटला कायदेशीर लढाईत ५ कोटी रुपये भरपाई स्वरूपात मिळाले आहेत. कॅलिफोर्नियातील फेडरल कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

आपल्या अनोख्या लुक्समुळे कॅलिफोर्नियात राहणारे ताबाथा बुन्डेसेन यांची पाळीव मांजर इंटरनेटवर प्रसिद्ध होती. अनेक वर्ष फेम मिळाल्यानंतर या मांजरीच्या मालकाला एका कॉफी कंपनीकडून एक ऑफर मिळाली. ऑफरनुसार ही कंपनी मांजरीचा लूक कॉफी कंटेनरवर वापरण्यास इच्छुक होती. मांजरीच्या मालकाने या डीलपूर्वी ग्रांपी कॅट नावाने एक कंपनी रजिस्टर केली आणि कॉफी कंपनीला मांजरीचे फोटो वापरण्याचे अधिकार दिले. मांजरीचे फोटो एग्रीमेंट नियमानुसार फक्त कॉफी कंटेनर Grumppuccino वर वापरण्याचे ठरले होते. परंतु कंपनीने इतर प्रॉडक्टवरही या फोटोंचा वापर केला.

कॉफी कंपनीच्या विरोधात ग्रांपी कॅट कंपनीने मांजरीच्या फोटोचा मिसयुज केल्याची केस दाखल केली. न्यायालयामध्ये कॉफी कंपनीनेही काउंटर केस दाखल करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतु कोर्टाचा निर्णय मांजरीच्या बाजूने लागला. कोर्टाने कॉफी कंपनीला दोषी ठरवत मांजरीला ५ कोटी रुपय नुकसान भरपाई देण्याचे आदिशे दिले.

Leave a Comment