फ्लॉवर ज्युवेलरीचा ट्रेंड जोरात


लग्न समारंभ म्हणजे सोने, चांदी, हिऱ्यांचे दागदागिने हवेतच. ज्यांना ते परवडत नाहीत ते इमिटेशन ज्युवेलरी घालून वेळ साजरी करतात. पण आजकाल मात्र सोने चांदी बरोबरच खऱ्या फुलांपासून बनविलेले दागिने मिरविण्याचा ट्रेंड भलताच लोकप्रिय होताना दिसत आहे. प्राचीन काळातील ऋषीमुनी कन्यांची चित्रे आपण पहिली तर त्यात शकुंतला, सीता वगैरे नायिका फुलांच्या माळांनी सजविलेल्या दिसतात अगदी त्याच पद्धतीने आजकालच्या आधुनिक मुली फुलांच्या दागिन्यांनी सजलेल्या दिसत आहेत. केवळ वधू नाही तर मुलीचे नातेवाईकही या दागिन्यांना पसंती देताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आजकाल ऑर्किड, जरबेरा, मोती, गुलाब, मोगरा, निशिगंध या फुलांपासून विविध दागिने केले जातात. त्यात बिंदी, बांगड्या, कमरबंद, बाजूबंद, चोकर, नेकलेस, पैंजण, कानातले टॉप्स असे सर्व प्रकारचे दागिने आहेत. एके काळी गुलाब आणि मोगरा या फुलांना अधिक मागणी होती मात्र आता विविध फुलाची मागणी आहे. २५ ते ३० हजार रुपयांत हे दागिने बनतात.

या दागिन्यांसाठी आणली जाणारी आर्किड थेट बँकॉक मधून येतात तर मोती, निशिगंध कोलकाता येथून मागविली जातात. मोगरा दक्षिण भारतातून येतो. कोलकाता येथून येणारी मोती फुले अगदी खऱ्या मोत्याचा भास निर्माण करतात असे हे दागिने बनवून देणारे कलाकार सांगतात.

Leave a Comment