फेरारीच निवडते त्यांचे ग्राहक


जगात पैशाने काहीही खरेदी करता येते असे म्हणले जाते मात्र सर्वाधिक लोकप्रिय ब्रांड असलेल्या फेरारी च्या कार विशेषतः लिमिटेड एडिशन कार याला अपवाद आहेत. या कार तुम्ही राजा अथवा अब्जाधीश असलात तरी तुम्हाला मिळतील असे नाही कारण कंपनीच त्याच्या कार कुणाला द्यायच्या याची निवड करत असते व येथे कोणताही दबाव कामाचा ठरत नाही.

कंपनीचे चीफ मार्केटिंग अधिकारी एन्रिको गॅलेगिया द ड्राईव्ह ला मुलाखत देताना म्हणाले त्यांच्या नोकरीत सर्वात अवघड भाग आहे तो नाही म्हणणे.ते सांगतात आमच्या लिमिटेड एडिशन कार साठी नेहमीच मागणी जास्त असते पण पुरवठा कमी पडतो. त्यामुळे आमच्या या कार कुणाला द्यायच्या आणि कुणाला नाही याचा निर्णय आम्हीच घेतो. अनेकदा कार मिळावी म्हणून दबाव टाकला जातो. पण आम्ही त्याला बळी पडत नाही.

आम्ही निवड करताना आमच्या बेस्ट कस्टमरची निवड वेगळ्या प्रकारे करतो. फेरारीचे ग्राहक होणे सोपे नाही. अनेकदा चांगले ग्राहक आमच्या टॉप २०० मध्ये निवडले जात नाहीत. काही जणांना नाही ऐकायची सवय नसते. त्यामुळे ते वारंवार विचारणा करतात पण आम्ही निवडक ग्राहकांनाच कार देतो. उदाहरण द्यायचे तर आमच्या फेरारी अॅपर्ता कन्व्हरटीबल साठी आम्ही निवडक २०० जणांना फक्त कारची किल्ली पाठविली होती आणि कार न पाहता खरेदी करणार काय अशी विचारणा केली. १८ लाख डॉलर च्या या सर्व कार किल्ली पाठविलेल्या ग्राहकांनी न पाहताच खरेदी केल्या. परिणामी उत्पादित होतानाचा सर्व कार विकल्या गेल्या होत्या.

Leave a Comment